नांदेड -मुखेड तालुक्यातील मुक्रमाबादसह परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. पावसाने नदी, नाल्याला पूर आला होता, पुरामध्ये रस्ता ओलांडताना एका वृद्धाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हा वृद्ध जेव्हा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तीथे अनेक प्रत्यक्षदर्शी उभे होते, ते या वृद्धाचा रस्ता ओलांडताचा व्हिडिओ काढत होते. मात्र या वृद्धाच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. वृद्ध वाहून जातानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुराच्या पाण्यात रस्ता ओलांडण्याचा वृद्धाचा प्रयत्न तळ्याच्या काठी आढळला मृतदेह
मुखेड तालुक्यातील खतगाव येथील विठ्ठलराव धोंडीबा माने (६५) हे शेतात शेळ्या चारुन घरी परतत असताना, अचानक मोठा पाऊस झाल्याने गावाच्या पूर्वेस मोठ्या पुलावरुन पाणी वाहत होते. माने यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते पाण्यात वाहून गेले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. तळ्याच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचा -घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात; पाहा व्हिडिओ