नांदेड तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर आज घरोघरी तिरंगाचा Har Ghar Tiranga अभिनव शुभारंभ करण्यात आला. चारी बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे Adivasi Pada या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले होते.अवघ्या १५ उबंरठयाच्या कोलामपोड येथील या उत्सवाला साक्षीदार होण्यासाठी आमदार भिमराव केराम जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार तहसिलदार डॉ मृणाल जाधव जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार गटविकास अधिकारी सुभाष धनवे आदी उपस्थित होते. गावातील जेष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम ही महिला गावातील इतर महिला समवेत आपल्या दाराला तिरंगा लावण्यासाठी सज्ज झाल्या. सडे आणि रांगोळीने सजलेल्या खांबाला त्यांनी तिरंगा लावून देश प्रेमाची एक नवी ऊर्जा दिली. या देशाची आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे. याचा सर्वांना आम्हाला अभिमान आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व देशाप्रती कृतज्ञता म्हणून आम्हाला हा तिरंगा उत्सव साजरा करताना विशेष आनंद असल्याच्या भावना नागुबाईने आपल्या तोडक्या भाषेत सांगितल्या.
प्रतिमेचे मान्यवरांनी केले पूजन किनवट येथील आदिवासी विकास प्रकल्प मार्फत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा हा उपक्रम प्रत्येक पाड्यावर साजरा होण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन केले. प्रकल्पातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः एकेक पाडा निवडून त्या ठिकाणी आदिवासी बांधवांसमवेत घरोघरी तिरंगा उत्सव साजरा केल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच पूजार यांनी दिली. यावेळी मान्यवरांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गावातून विविध पाडयामधून विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून अवघा परिसर देशभक्तीमय केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar शहीद भगवान बिरसा मुंडा Martyr Lord Birsa Munda शामादादा कोलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.