नांदेड : शहरातील सभेची संपूर्ण तयारी झाली असून पन्नास हजार नागरिक बसतील असे मंडपाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 50 हजार खुर्च्या टाकण्यात आले आहेत. त्यातच स्टेजवर मोठे एलसीडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना व नागरिकांना व अन्नदानाची व्यवस्था ही करण्यात आली आहे.
अमित शाह यांची सायंकाळी चार वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा मैदान, अबचलनगर येथे विशाल सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, पालकमंत्री गिरीश महाजन आदी नेते उपस्थित राहणार आहेत. या विशाल सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदा प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे.
मोदी सरकारच्या कामगिरीचा मांडण्यात येणार लेखाजोखा:सभेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त भाजपन महाजनसंपर्क अभियान सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या कामगिरीचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा अबचलनगर मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
भव्य मंडप बांधण्यात आला:खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे आहे. सभेला जवळपास ५० हजार जनसमुदाय उपस्थित रहावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जाहीर सभेसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. अबचलनगर येथील मैदानावर भव्य मंडप उभारला जात आहे.