नांदेड : मराठवाड्याला सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य बनवण्यात मोठे योगदान दिल्याची स्तुतीसुमने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नांदेड येथे उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास काय असतो, हे 9 वर्षात देशातील जनतेला दाखवून दिल्याचेही अमित शाह यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला विकास :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात विकास काय असते, हे देशातील जनतेला दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात विकास झाला आहे. त्यांच्याच नेतृत्वात सर्वच क्षेत्रात देशात विकास झाला. मात्र राहुल गांधीच्या पिढ्या राजकारणात आहेत, मात्र तरीही त्यांनी काय केले असा सवालही अमित शाह यांनी यावेळी केला. नांदेड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली.
महाराष्ट्र १ नंबर बनवण्यात फडणवीस यांचे मोठे योगदान :महाराष्ट्र हा देशात नंबर वन करण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जाते. महाराष्ट्र देशात नंबर एक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान असल्याचे अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात महाराष्ट्राचा विकास झाल्याचा दावा अमित शाह यांनी केला.
उद्धव ठाकरे जात नव्हते कार्यालयात :महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भाजपच्या युतीला मतदान केले होते. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबहत जाऊन विश्वासघात केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कार्यालयात जातच नव्हते. तर राहुल गांधी यांच्या आजी, वडील, असे सगळे राजकारणात असूनही त्यांनी काय केले, असा सवालही अमित शाह यांनी यावेळी विचारला. त्यामुळे तुम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान कराल की राहुल गांधी यांना असेही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारले.
हेही वाचा -
- Amit Shah Rally In Nanded : गृहमंत्री अमित शाह अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला लावणार सुरुंग; केसी चंद्रशेखर रावांना देणार धक्का ?