नांदेड :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी 2019 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या प्रचार मोहिमेचा एक भाग म्हणून नांदेड येथे आयोजित सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, भाजपने गेल्या वर्षी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार पाडले नाही, तर ठाकरेंच्या धोरणांना कंटाळलेले शिवसैनिक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार नाहीत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंना प्रश्न :या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंना अनेक प्रश्न देखील विचारले. ट्विटकरून भाजपा म्हणाला आहे की, उद्धवजी आम्ही तिहेरी तलाक रद्द केला, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही? जे राम मंदिर बांधले जात आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही? तुम्हाला समान नागरी कायदा हवा आहे की नाही हे तुम्ही स्पष्ट करा? मुस्लिम समाजाला आरक्षण असावे की नाही? हे तुम्ही सांगा. कर्नाटकात वीर सावरकर यांचा इतिहासपुस्तकांमधून काढून टाकायचा आहे, तुम्हाला ते मान्य आहे का? या सर्व मुद्यांवर तुमची भूमिका स्पष्ट करा, असे अमित शाहंनी म्हटले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशाचा पंतप्रधान राहुल गांधी होणार की, नरेंद्र मोदी हे जनतेने ठरवायचे आहे - अमित शाह
भूमिका स्पष्ट करा : तिहेरी तलाकची प्रथा रद्द करणे, अयोध्येतील राम मंदिर उभारणे, समान नागरी कायदा आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत ते सहमत आहेत की नाही? यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे धाडस ठाकरेंनी करावे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच अमित शाह म्हणाले की, तुम्ही दोन बोटीत बसू शकत नाहीत. या सर्व मुद्यांवर तुमची भूमिका स्पष्ट करा, म्हणजे तुमचा पर्दाफाश होईल, असे ते म्हणाले.