महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच मोदी पंतप्रधान' - असुदुद्दीन ओवैसी - एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवैसी

काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच २०१४, २०१९ मध्ये मोदी पंतप्रधान झाले, तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राजकारण खोटारडे आहे आणि त्यांचे हेच राजकारण त्यांना संपवेल, अशी टीका एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

असुदुद्दीन ओवैसी

By

Published : Oct 10, 2019, 2:28 PM IST

नांदेड - एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. नांदेड येथे पक्षाचे उमेदवार साबेर चाऊस आणि फेरोज लाला यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना त्यांनी हा निशाणा साधला आहे.

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांची नांदेड येथे सभे दरम्याण अशोक चव्हाण यांच्यावर टीका

चव्हाणांचे राजकारण खोटारडे - ओवैसी

अशोक चव्हाण यांचे राजकारण खोटारडे आहे. हेच खोटारडे राजकारण अशोक चव्हाण यांना संपवेल, अशी घणाघाती टीका असुदुद्दीन ओवैसी यांनी नांदेडच्या सभेत बोलताना केली आहे.

हेही वाचा... वजीराबाद गोळीबार प्रकरणात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई

अशोक चव्हाण हे मुसलमानांना हिंदुची मते मिळत नाहीत, असे सांगतात आणि 'आम्हाला उमेदवारी नको'', असे मुस्लिम इच्छुक उमेदवारांकडून लिहून घेतात, असा आरोपही ओवैसी यांनी चव्हाण यांच्यावर केला आहे.

हेही वाचा... नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघात तिरंगी-चौरंगी लढती...युती-आघाडीपुढे बंडखोरीचे आव्हान​​​​​​​

काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच मोदी पंतप्रधान- ओवैसी

आज संपूर्ण देशात काँग्रेसचे अस्तित्व राहिले नाही. आता काँग्रेसमध्ये पुन्हा उभारण्याची ताकद राहिलेली नाही. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच २०१४, २०१९ मध्ये मोदी पंतप्रधान झाले, असाही आरोप ओवैसी यांनी यावेळी केला आहे. नांदेडमध्ये, नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे अधिकृत उमेदवार साबेर चाऊस, फेरोज लाला यांची प्रचार सभा आयोजीत केली होती. यावेळी बोलत असताना ओवैसी यांनी चव्हाण यांच्यावर चौफेर टीका केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details