महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पांडुरंग पावला..! मोठ्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी - rain

शहरासह जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱयांत चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र गुरूवारी  सायंकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

By

Published : Jul 12, 2019, 8:25 AM IST

नांदेड- शहरासह जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला गुरुवारी सायंकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी


यंदाचा मान्सून उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या मागास झाल्या आहेत. सुरुवातीला मान्सून विजांच्या गडगडाटासह बरसला होता. मात्र, त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी तासभर चांगला पाऊस बरसला. आजमितीला जिल्ह्यात केवळ 28 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्या पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details