नांदेड - प्रशासन कुठल्याही कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळत नसल्याची गंभीर तक्रार नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे केली ( MP Pratap Patil Chikhalikar complaint to Lok Sabha Speaker ) आहे. नांदेडचे प्रशासन कुणाचे तरी वैयक्तिक नोकर असल्याप्रमाणे वागत असल्याची टीका चिखलीकरांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली. ( Pratap Patil On Ashok Chavan )
चिखलीकरांची लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार -नांदेडमध्ये होणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील यांना डावलले जात आहे. कुठल्याही शासकिय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार चिखलीकरांचे नाव टाकले जात नाही. शासकीय उद्घाटनाच्या ठिकाणी कोनशिलेवर नाव टाकले जात नाही. खासदार म्हणून नाव टाकणे राजशिष्टाचार असताना चिखलीकरांना डावलले जात आहे. त्यामुळे खासदार चिखलीकरानी थेट लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली.