नांदेड - अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे शिक्षा व दहा हजार दंड ठोठावला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसनी येथे ही घटना घडली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा; भोकर न्यायालयाचा निकाल - नांदेड
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.
तानाजी माधवराव पाळजकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने 17 मे 2016 ला 15 वर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने महाराष्ट्रातील सोनारी येथून मध्यप्रदेशमध्ये पळवून नेले. लग्नाचे अमिष दाखवत तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. आरोपीस अपराध करण्यासाठी इतर काही जणांनी सहकार्य केले होते, अशी तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी दिली होती. हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
19 जून 2020 ला सरकारी पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासून तक्रारदार, पीडित मुलगी, आणि साक्षीदारांच्या सबळ पुराव्याआधारे आरोपीस दोषी ठरवण्यात आले. भोकर जिल्हा न्यायाधीश मुजिब एस. शेख यांनी आरोपी तानाजी माधवराव पाळजकर यास दहा वर्षांचा तुरुंगवास व दहा हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अँड. रमेश राजूरकर यांनी काम पाहिले. तर पोलीस उपनिरीक्षक एन.आर.गायकवाड यांनी तपास केला.