महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकाला तीन वर्षाची शिक्षा - accused sentence for three years jai nanded

27 जुलै 2018 ला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी घराच्या बाजुस शौचास गेली असता आरोपीने पाठीमागून येवून बळजबरीने छेड काढून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भोकर पोलिसात आरोपी विरुद्ध अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

nanded
नांदेड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकाला तीन वर्षाची शिक्षा

By

Published : Jan 19, 2020, 8:39 PM IST

नांदेड - भोकर तालुक्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. गोविंद भगवानराव जाधव (वय 22 रा. हाडोळी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शनिवारी आरोपी गोविंदला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी तीन वर्षाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा -धक्कादायक.. नाशिकमध्ये भरयात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

याबाबतची सविस्तर माहिती अशी, की 27 जुलै 2018 ला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी घराच्या बाजुस शौचास गेली असता आरोपीने पाठीमागून येवून बळजबरीने छेड काढून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भोकर पोलिसात आरोपी विरुद्ध अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा -मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी केल्या १६ लाखांच्या दुचाकी चोरी; लातुरातील टोळीचा पर्दाफाश

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उप अधिक्षक ए. बी. देशपांडे यांनी करुन जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी आणि सबळ पुराव्याआधारे आरोपी गोविंद जाधव याला दोषी ठरवत जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला 3 वर्षांची शिक्षा आणि 9 हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. रमेश राजुरकर यांनी बाजु मांडली. तर पैरवी अधिकारी जमादार फिरोजखाँ पठाण यांनी काम पाहिले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details