नांदेड - मुखेड तालुक्यातील एका विधवेच्या असहायतेचा फायदा घेत पत्नी सारखे नांदवण्याचे आमिष दाखवले. ती गरोदर राहिल्यानंतर तिला सोडून आरोपींने पळ काढला. याप्रकरणी आरोपी विरूद्ध मुखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे.
विधवा महिलेला नांदवण्याचे आमिष दाखवून बलात्कार, आरोपीला अटक - नांदेड गुन्हे वृत्त
नांदेड मुखेड तालुक्यातील एका विधवेच्या असहायतेचा फायदा घेत पत्नी सारखे नांदवण्याचे आमिष दाखवून तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
मुखेड तालुक्यातील एका (२९ वर्षी) महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती माहेरी राहत होती. तिच्या असहायतेचा फायदा घेण्यासाठी नागेश व्यंकट कांबळे, (वय २५, ता मुखेड) हा तिच्या घरी नेहमी जात येत होता. सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०१९ यादरम्यान त्याने पीडित महिला घरी एकटी असल्याची संधी साधून पत्नी सारखे ठेवण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तुझ्या पतीचा मृत्यू झाला असला तरी, मी तुला पत्नीसारखे नांदवेन असे आश्वासन नागेशने त्या महिलेला दिले होते. त्यानंतर ते दोघे जण बिलोली येथे भाड्याच्या घरात पती-पत्नीसारखे राहू लागले. दरम्यान, ही विधवा पीडिता गरोदर राहिल्यामुळे नागेश हा तिला सोडून निघून गेला. तो परत येईल याची प्रतीक्षा केल्यानंतर पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी नागेशला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात कलम ३७६ (२) (प) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.