महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये दोन तरुणांना मारहाण करून लुटले - नांदेड गुन्हे बातमी

चिखलवाडी भागात 2 तरुणांना मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nanded
नांदेडमध्ये दोन तरुणांना मारहाण करून लुटले

By

Published : Feb 5, 2020, 11:56 AM IST

नांदेड- शहरातील चिखलवाडी भागात पायी जाणाऱ्या 2 तरुणांना 4 जणांनी मारहाण करून लुटल्याची घटना रात्री घडली आहे. आरोपींनी तरुणांच्या खिशातील पैसे आणि मोबाईल काढून घेतला. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात 4 संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - चिथावणीखोर भाषण : महंमद सलमान अहमद यांच्यावर गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, श्याम नरहरी भावे (रा.कौठा) आणि अनिस शेख हे 2 तरुण रात्री साडेआठच्या सुमारास चिखलवाडी भागातून पायी जात होते. त्यावेळी मारुती मोबाईल शॉपीजवळ आले असता, त्यांना 4 जणांनी अडवले. मारहाण करून श्याम भावे याच्या खिशातील 10 हजार रुपये आणि 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेतला. तसेच अनिस शेख याच्या खिशातील 2 हजार रुपये व 1 हजार 200 रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून घेतला. याप्रकरणी गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत.

हेही वाचा - नांदेड : प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या तीनही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नांदेड शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून जबर मारहाण करून लुटण्याचा घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याने अशा घटनेत वाढ होत असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details