नांदेड- शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. राजींदरसिंघ जोगिंदरसिंघ (२२) असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
पोलिसांना गुगांरा देऊन आरोपीचे रुग्णालयातून पलायन, दोन पोलीस निलंबित - नांदेड पोलीस
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. राजींदरसिंघ जोगिंदरसिंघ (२२) असे या आरोपीचे नाव आहे.
राजींदरसिंघ याला अफिम बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयाच्या आदेशाने त्याला वजिराबाद येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९ डिसेंबरला रात्री ९ वाजता त्याने बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. आरोपी राजींदरसिंघ याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वजिराबाद ठाण्यातील हवालदार संजयकुमार पवार व सुरेश वाघमारे यांना तैनात करण्यात आले होते. मात्र, आरोपीने कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पळ काढला. अद्यापही आरोपी पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी पोलीस कर्मचारी पवार व वाघमारे यांचा कसूरी अहवाल पोलीस उपअधीक्षक अभिजीत फस्के यांच्याकडे सादर केला.
हा अहवाल प्राप्त होताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हवालदार संजयकुमार पवार व सुरेश वाघमारे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. अद्यापही फरार आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढण्यात यंत्रणेला यश आले नाही.