नांदेड -अर्धापूर ते नांदेड मार्गावर दोन दुचाकींची जोरात धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. तसेच यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. हा अपघात आज (बुधवारी) दीड वाजता घडला. अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सनशाईन गार्डन मंगल कार्यालयासमोर ही घटना घडली. यातील जखमींना महामार्ग पोलीस पथकांनी रूग्णालयात दाखल केले आहे.
अर्धापूर-नांदेड महामार्गावर दुचाकीचा अपघात; एक ठार, दोन जखमी हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; पाच बिगर काश्मिरी मजूरांचा मृत्यू
नांदेडहून अर्धापूरकडे दुचाकी (क्रमांक- एमएच - २६ एक्यू ३५१६) वरून संतोष रामजी कदम (वय २९) जात होते. त्याच्या सोबत त्याचा मित्र विलास थोरातही होता.अर्धापूरहून नांदेडकडे जाणारी दुचाकी (क्रमांक- एमएच - 26 एयु ५७७८) वरुन सेवानिवृत्त सैनिक सुभाष बोराटे जात होते. दोन दुचाकींची जोराची धडक झाली. यात संतोष रामजी कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष बोराटे व विलास थोरात हे दोघे जखमी झाले आहेत. यातील सुभाष बोराटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे व महामार्ग सुरक्षा पथकाचे एआर रहेमान यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - 'आठवड्यातील वार सत्तेसाठी वाटून घ्या आणि उरलेला रविवार आठवलेंना द्या', आव्हाडांची टीका