नांदेड :वाळूचे टिप्पर नियमितपणे चालू देण्यासाठी २१ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ( Nanded Police ) स्टेशनचे पोलिस शिपाई शिवाजी पाटील (वय ३५) आणि अन्य एक मारोती गोविंदराव कवळे यांच्याविरोधात गुन्हा ( Crime ) दाखल करण्यात आला आहे.
Acb Trap Police : लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायासह एकाविरुद्ध गुन्हा - नांदेड
नांदेड : नांदेडमध्ये ( Nanded ) वाळूचे टिप्पर नियमितपणे चालू देण्यासाठी २१ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ( Nanded Police ) स्टेशनचे पोलिस शिपाई शिवाजी पाटील (वय ३५) आणि अन्य एक मारोती गोविंदराव कवळे यांच्याविरोधात गुन्हा ( Crime ) दाखल करण्यात आला आहे.
फोन पे वरून घेतले पैसे - शिवाजी पाटील याने फोन पे ( Phone Pe ) या अँपने ७ हजार रुपय स्वीकारले तर १४ हजार रुपये रोख स्वरुपात घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरमहा 21 हजारांची होती मागणी -तक्रारदाराचा वाळू विक्री व्यवसाय आहे. त्याच्याकडून २१ हजार रुपय दर महिन्याला देण्याची मागणी नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई शिवाजी पाटील यांनी केली होती. सोमवारी १४ हजार रुपये खाजगी इसम मारोती कवळे यांच्यामार्फत ६ जून त्यांनी रोजी स्वीकारले. विभागाचे अधिकारी पथक शिवाजी पाटील आणि मारोती कवळे यांचा मागावर होते. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.