नांदेड : भ्रष्टाचारावर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या आणि भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अशी ओळख असणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कुंपनच शेत खातंय या म्हणीचा प्रत्यय आला आहे. तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थांमार्फत लाच मागणाऱ्या महिला पोलीस निरीक्षक ( Nanded ACB PI arrest ) एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. मीना बकाल असे या निरीक्षकाचे नाव ( ACB inspector Meena Bakal arrest ) आहे. त्यांच्या पतीलाही अटक करून या दोघांचीही रवानगी कोठडीत करण्यात आली
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर येथील खाजा मगदूम शेख यांच्या भाऊ शेख मेहराज यांचा कंधार येथील तहसील कार्यालयासमोर कागदपत्रे तयार करून देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या भावाला एसीबी कार्यालयातून ( Aurangabad ACB ) तुमच्या विरोधात तक्रार आली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी बोलाविण्यात आले आहे, असे सांगण्यात आले होते. ही बाब त्यांनी खाजा मगदूम शेख यांना सांगितली. त्यानंतर शेख यांना सय्यद शकील सय्यद अजीमसाब आणि सय्यद इस्माईल सय्यद अजीम या दोघांनी संपर्क साधून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची ( Meena Bakal arrest by Aurangabad ACB ) मागणी केली.