नांदेड -माहूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला 21 वर्षांचा तरुण पोलीस कोठडीतून पळून गेला होता. करण रामराव खुपसे असे त्याचे नाव असून 25 नोव्हेंबरला सकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याने पोबारा केला. यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. अखेर आज माहूर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
नांदेड : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा पोबारा; मात्र 24 तासांत जेरबंद - nanded rape case
माहूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला 21 वर्षांचा तरुण पोलीस कोठडीतून पळून गेला होता. करण रामराव खुपसे असे त्याचे नाव असून 25 नोव्हेंबरला सकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याने पोबारा केला. यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. अखेर आज माहूर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
माहूर तालुक्यातील अनमाळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी करण खुपसे विरोधात 12 जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. मात्र, मागील पाच महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर सापळा रचून 24 नोव्हेंबर रोजी अनमाळ परिसरात त्याला अटक करण्यात आली. आरोपीने पुढील दिवशी पहाटेच्या वेळी कोठडीतील शौचालयात पाणी नसल्याने प्रातःविधीसाठी बाहेर जाण्याची मागणी केली. यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. यावेळी त्याने काळोखाचा फायदा घेत धूम ठोकली.
26 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास आरोपीस आनमाळ परिसरात जेरबंद करण्यात आले. या पथकात पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सह पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके आणि अन्य पोलीस कर्मचारी होते.