नांदेड - केंद्र शासनाने केलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनाला राज्यातून देखील प्रतिसाद मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत 'रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन' सुरू केले.
शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये 'स्वाभिमानी'चे 'रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन' - farmers law news
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत 'रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन' सुरू केले.
नांदेड
रात्रभर जागर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर शेतकऱ्यांनी जागर आंदोलन केले. केंद्राच्या कायद्याविरोधात दिल्लीत शेतकरी इतक्या थंडीत रस्त्यावर आले. त्यांना समर्थन म्हणून राज्यभर रात्री जागर करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकऱ्यानी सांगितले. सरकारला जाग यावी, म्हणून जागर करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.