नांदेड: नांदेड जिल्ह्यातील मयुरी पुंजरवाड ही आदिवासी कोळी समजाची विद्यार्थिनी एमबीबीएस झाली आहे. (Caste Validity Certificate) पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी तिने संभाजीनगरच्या जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज दिला होता. (hindu gods goddesses by tribal )समितीने वैधता तपासणी करत जात वैधता नाकारली. (rejection of caste validity certificate ) अर्जदार मयुरी ने महादेव आणि खंडोबाची पूजा केल्या जात असल्याचे सादर केले आहे. (abandonment of hindu gods goddesses) महादेव आणि खंडोबाची पूजा साधारणतः हिंदू धर्मात केली जाते. तसेच अर्जदाराची विवाह पद्धाती हिंदू प्रमाणे असल्याची सबब देत जात पडताळणी समितीने वैधता नाकारली.
आयटीआय चौकात सभा: या निकालानंतर आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक झाले आहे. (abandonment of hindu gods goddesses) आज नांदेडमध्ये शेकडो आदिवासी महिला आणि बांधवांनी देव सोबत घेत देव देवतांचा त्याग करण्यासाठी आंदोलन केले आहे. मोर्चाला परवानगी न दिल्याने आदिवासी कोळी बांधवांनी आयटीआय चौकात सभा घेत, तहसीलदार आंबेकर यांच्याकडे आपल्या देव देवता सुपूर्द केल्या आहेत. शेकडो महिला आणि पुरुषांनी आपल्या देव देवता तहसीलदारांकडे देत देव देवतांचा त्याग केला. हिंदू देव देवतांची पूजा केल्याने जर जात वैधता नाकारली जात असेल, तर अश्या हिंदू देव देवतांचा आम्ही त्याग करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.