नांदेड - जिल्ह्यातील मुखेड येथील कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात पाच कोरोनारुग्णांची भर पडली. नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत रुग्णसंख्या 143 झाली आहे. यात 99 जणांना डिस्चार्ज दिला असून, 36 जणांवर विविध केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यात 29 मे सांयकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 113 व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी 108 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 5 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 143 झाली आहे. या रुग्णावर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे.
जिल्ह्यात आज एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील 8 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 1 रुग्ण असे एकूण 9 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 143 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 99 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरित 36 रुग्णांवर औषधोपचार चालू असून, त्यातील 2 महिला रुग्ण वय वर्षे 52 आणि 55 यांची प्रकृती गंभीर आहे.
आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत आढळलेले 5 पॉझिटिव्ह रुग्ण हे वेगवेगळ्या भागातील आहेत. यापैकी 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. मुखेड येथील एका महिला रुग्णाचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला आहे.