महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एक झाड लावा,हजार रुपये मिळावा' हरित कंधार परिवाराचा अनोखा उपक्रम - unique initiative for planting trees

'एक झाड लावा आणि हजार रुपये मिळावा' या अभियानातून आता पर्यंत शहरात पाचशे झाडं लावण्यात आली आहेत. शहरातील मुख्य रस्ते आणि कॉलनीत ही झाडे लावली आहेत. लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडावर अँपच्या माध्यमातून नजर ठेवली जाते.

हरित कंधार
हरित कंधार

By

Published : Jun 12, 2020, 4:37 PM IST

नांदेड -पर्यावरण समतोलासाठी झाडे लावणे आणि ते जगविणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी अनेकवेळा वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले जाते. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. केवळ संदेश न देता प्रत्यक्ष झाडे लावण्याचा संकल्प शिवा मामडे यांनी केला आहे. नागरिकांनाही हरित कंधार अभियानात सहभाग घ्यावा, म्हणून शिवा मामडे यांनी 'एक झाड लावा आणि हजार रुपये मिळावा' हा उपक्रम राबवला आहे.

'एक झाड लावा,हजार रुपये मिळावा' हरित कंधार परिवाराचा अनोखा उपक्रम

'एक झाड लावा आणि हजार रुपये मिळावा' या अभियानातून आता पर्यंत शहरात पाचशे झाडं लावण्यात आली आहेत. शहरातील मुख्य रस्ते आणि कॉलनीत ही झाडे लावली आहेत. लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडावर अँपच्या माध्यमातून नजर ठेवली जाते.

शासन स्तरावर वृक्षारोपन तर केले जाते. मात्र, नियोजनाअभावी झाडे वाढताना दिसत नाही. कंधार मधील तरुणांनी 'हरित कंधार' या संकल्पनेतून झाडं लावली आणि वाढवली आहेत. तसेच 'हरित शहर स्वच्छ शहर' असा संदेशही त्यांनी दिला आहे. या उपक्रमाचं नांदेडकरांनी कौतुक केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details