महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

... म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात भरवली शाळा

धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांनी शाळा भरवली.

मुख्य कार्याकारी अधिकाऱ्यांच्या दालनात भरलेली शाळा
मुख्य कार्याकारी अधिकाऱ्यांच्या दालनात भरलेली शाळा

By

Published : Jan 8, 2020, 3:47 PM IST

नांदेड- धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच शाळा भरविल्याने कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.

माहिती देताना


धर्माबाद तालुक्यातील करखेली येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उर्दू माध्यमाची शाळा चालते. या शाळेत केवळ तीनच शिक्षक असल्याने गावकरी वेळोवेळी शिक्षकांची मागणी केली होती. या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मंगळवारी (दि. 7 जाने.) सकाळी करखेली येथील विद्यार्थी व पालक जिल्हा परिषद कचेरीत दाखल झाले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडून शाळा भरविली.


विद्यार्थ्यांसोबत करखेली येथील शेख मैनोद्दीन, शेख सादीक, शेख अहेमद, शेख हसीन यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा - अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details