महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 25, 2020, 10:35 AM IST

Updated : Dec 25, 2020, 10:47 AM IST

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात खरीप व रब्बीसाठी पीककर्ज वाटपासाठी दोन हजार 636 कोटी रुपयांची उद्दिष्ट निश्चित

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (नाबार्ड) बँकेमार्फत जिल्ह्यासाठी 2021-22 साठी संभाव्य ऋण आराखडा प्रकाशित करण्यात आला. पाच हजार 436 कोटी 39 लाख रुपयांचा संभाव्य ऋण आराखडा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते प्रकाशित केला गेला.

Nanded NABARD news
नांदेड संभाव्य ऋण आराखडा प्रकाशित

नांदेड - राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (नाबार्ड) बँकेमार्फत जिल्ह्यासाठी 2021-22 साठी संभाव्य ऋण आराखडा प्रकाशित करण्यात आला. पाच हजार 436 कोटी 39 लाख रुपयांचा संभाव्य ऋण आराखडा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते प्रकाशित केला गेला. यात खरीप व रब्बीसाठी पीककर्ज वाटपासाठी दोन हजार 636 कोटी रुपयांची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
संभाव्य ऋण आराखडा निश्चित
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेतर्फे दरवर्षी संभाव्य ऋण आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यावर आधारित जिल्ह्यातील सर्व बँकांचे वार्षिक लक्ष्य निश्चित होत असते. नाबार्डच्या आराखड्यानुसार 2021-22 मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी पाच हजार 436 कोटी 39 लाख रुपयांचा संभाव्य ऋण आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यात पीक कर्जासाठी दोन हजार 636 कोटी रुपयांची निश्चिती करण्यात आली आहे. यात मागील वर्षाच्या तुलनेत 98 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
विभागनिहाय तरतूद
पशुसंवर्धन व दुग्धविकासासाठी 120 कोटी, सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योगासाठी एक हजार 312 कोटी, स्वयंसहायता बचत गटांसाठी 151 कोटी असे एकूण पाच हजार 436 कोटींचा संभाव्य कर्ज आराखडा निश्चित करण्यात आला आहे. 'नाबार्ड' ने कृषी आणि कृषी क्षेत्रासाठी असलेल्या संभावना, उपयुक्त पायाभूत सुविधा आणि अपेक्षित कर्जपुरवठा याची सांगड घालून 2021-22 वर्षासाठी आराखडा सादर केल्याची माहिती राजेश धुर्वे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन नियोजन भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ' नाबार्ड'चे जिल्हा विकास प्रबंधक राजेश धुर्वे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Dec 25, 2020, 10:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details