महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देगलूर शहरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू - Shivalila Mathapati death Degaloor

गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीत आईसह तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. जिल्ह्यातील देगलूर शहरातील शहाजीनगरमध्ये काल रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Shivalila Mathapati death news
देगलूर शहरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू

By

Published : Jan 5, 2021, 4:50 PM IST

नांदेड -गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीत आईसह तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. जिल्ह्यातील देगलूर शहरातील शहाजीनगरमध्ये काल रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघात की घातपात..?

शिवलीला मठपती (23 वर्षीय) असे आईचे नाव असून प्रज्योत (3 वर्षीय) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या माहेरच्यांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे, या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकरणी देगलूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -नांदेड जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायती बिनविरोध तर निवडणूक चिन्हांचेही वाटप

ABOUT THE AUTHOR

...view details