नांदेड -लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीसह त्यास मदत करणाऱ्या इतरांवर बलात्कारासह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मंगेश शामराव शिंदे (रा. करोडी ता. हदगाव वय-२३) याला अटक करण्यात आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Nanded physically abused news
लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीसह त्यास मदत करणाऱ्या इतरांवर बलात्कारासह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल hadgaon police station](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-08:52-mh-nanded-lagnache-amish-ddakhaun-mulivr-atyacharsumedhbansode-12062020070431-1206f-1591925671-1010.jpg)
पीडित मुलगी शिक्षण घेत असताना, तिच्या वर्ग मैत्रिणींकडून आरोपी मंगेशची ऑगस्ट २०१९ ला ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. संबंधीत मुलीशी लग्न करण्याचे आमिष दाखवून आरोपीने सतत दीड वर्ष संबंध ठेवल्याने पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने तिला गोळ्या खायला घालून तिचा गर्भपात केला. तरीही खोटी आश्वासने देऊन संबंध सुरूच ठेवले.
आपले लग्न जमत नाही म्हणून आरोपीने पीडित मुलीला मारहाण केली. ही सर्व माहिती घरच्यांना असल्याचे पीडितेने सांगितले आहे. संबंधीत मुलीच्या तक्रारीवरून हदगाव पोलिसांनी ९ जूनला आरोपी मंगेशसह आई, वडील व त्याचा भाऊ यांच्यावर कलन ३७६, ३१३, ३२३, ५०४, ५०६,
(३४) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम ३(१) ( १) ३(१)(२) ३(१)(६) प्रमाणे हदगाव पोलीस ठाण्यामधअये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.