नांदेड -बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला असल्याची घटना घडली होती. आरोपींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शंकरनगरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन हेही वाचा - जळगावात पूर्ववैमनस्यातून बांधकाम व्यावसायिकाला मारहाण
हा धक्कायदायक प्रकार 17 डिसेंबर 2019 ला घडला असून, ही संस्था माजी खासदाराची असल्याने साम दामचा वापर करून हे गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. संबंधीत घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करण्यात येत आहे. या निषेधार्थ लोकस्वराज्यच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. आरोपींवर कारवाई करुन दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी लोकस्वराज्यचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांनी केली आहे.
हेही वाचा - पतीने विभक्त राहणार्या पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; बदनामीची धमकी देत मुलाचा मागितला ताबा