शेतकऱ्यानं माळरानावर फुलवले नंदनवन नांदेड: एकीकडे शेतकरी नापिकी आर्थिक अडचणींचा सामना करत असताना आत्महत्या सारखे प्रकार राज्यात घडत आहेत. अगदी कमी व अल्पबचतीत कबीर कांबळे आणि त्यांच्या पत्नीने केलेला हा शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील केरूर् इथल्या कबीर कांबळे आणि त्यांच्या पत्नीने माळरानावर भाजी पाल्याची लागवड करत आर्थिक संकटावर मात केली आहे.
कृषी विभागाचे घेतले मार्गदर्शन: केरुर येथील अल्प भूधारक शेतकरी कबीर कांबळे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता कांबळे यांना वडिलोपार्जित नांदेड- देगलूर राज्य महामार्गालगत माळरानावर यांची पाच एकर खडकाळ जमीन आहे. या जमिनीवर पारंपरिक मूग, उडीद, तूर, कापूस यांसारखी पिके घेतली जातात. परंतु त्या पिकाचे उत्पन्न खर्च वजा जाता तुटपुंजे फायदा मिळत होता. कबीर कांबळे यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन शेतीसंबंधित माहिती घेतली.कर्मचाऱ्यांनी बाजुच्या खदानीतील पाण्याचे काटकसरीने वापर करण्याचे मार्गदर्शन व सल्ला दिला.
खडकाळ जमीनीवर शेती: दोन एकर जमिनीवर भाजीपाला त्यांनी घेतला. वांगे, गोबी, मिरची आणि मटकी अशा विविध पिकांची लागवड कांबळे यांनी केली. यातून रब्बी हंगामात त्यांना खर्च वगळता ८५ हजार रुपये निव्वळ नफा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान खदानीतील पाणी संपल्यामुळे बाजूच्या शेतकऱ्याचे पाणी भाड्याने घेतले. उन्हाळी हंगामात जमिनीचा उतार जास्त असल्यामुळे जमिनीच्या उंच टेकड्यांवर एक हजार लीटर क्षमतेची टाकी बसवून त्या टाकीत पाण्याची साठवणूक केली.त्या पाण्यावर ठिबक बसवून याच दोन एकरमध्ये उन्हाळी हंगामात काकडी आणि दोडके या भाजी पाल्याची लागवड केली. त्यापासून जवळपास एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची त्यांची अपेक्षा आहे.
पिकांवरील किड नियंत्रणासाठी देशी जुगाड: भाजी पाल्यावरील रोग व किड नियत्रंनात आणण्यासाठी चिकट सापळ्याचा उपयोग केला. पण बाजारातून ते खरेदी करण्यासाठी रक्कम नसल्याने कांबळे यांनी देशी जुगाड केला. तेलाच्या पेपरचे पत्रावर पिवळा रंग देऊन त्यास तेल आणि ग्रीस लावले त्यामुळे किडे पिवळ्या रंगाकडे आकर्षक होतात. यामुळे किड नियंत्रणात आली. अल्प रक्कमेत ही युक्ती काम करून गेली त्यामुळे शेतकरी कांबळे यांच्या पिकाला किडनियंत्रणापासून बचाव झाला आहे.
हेही वाचा: Renuka Devi नऊशे वर्ष जुने मंदिर जाणून घ्या माहूरच्या रेणुका देवीचा इतिहास