नांदेड - सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश जगन्नाथ सोनवणे यांना खंडणीची मागणी करून शिवीगाळ केल्याप्रकरणी एका माहिती अधिकार कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ए. के. वाघमारे असे त्या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल - नांदेड ग्रामीण पोलिस
सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश जगन्नाथ सोनवणे यांना आरटीआय कार्यकर्ता ए. के. वाघमारेनी खंडणीची मागणी करून शिवीगाळ केली. याप्रकरणी वाघमारेवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कलम 507 नुसार गुन्हा दारवल केला आहे.
सामाजिक वनीकरण विभाग मुखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गजन्नाथ सोनवणे यांना आरटीआय कार्यकर्ता ए. के. वाघमारे यांच्याकडून खंडणीची मागणी करण्यात येत होती. प्रत्यक्ष आणि फोनवरून धमकीच्या स्वरूपात ही खंडणी मागितली जात असल्याने सोनवणे यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
वाघमारे यांनी वीस हजार रुपयांची मागणी करत आपला बँक खाते क्रमांक सोनवणे यांना मॅसेज केला होता. नंतर 26 जून रोजी सोनवणे हे मुखेडहून नांदेडकडे येत असताना त्यांना पुन्हा खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास महागात पडेल, अशी धमकीही दिली. तसेच नोकरी निट करा, अन्यथा तुमच्या कारभाराचा पर्दाफाश करून गुन्ह्यात अडकावू असेही वाघमारे यांनी म्हटल्याचे सोनवणे यांनी सांगितले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात वाघमारे विरोधात कलम 507 नुसार गुन्हा दारवल केला आहे.