महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाड्यातील एका बड्या नेत्यास कोरोनाची लागण, नांदेडची रुग्णसंख्या 127 वर - नांदेड कोरोना बातमी

नांदेड येथील एका बड्या मंत्र्यास कोरोनाची लागण झाल्याची माहिती असून त्यांच्या चालकालादेखील कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

cororna in nanded
cororna in nanded

By

Published : May 25, 2020, 8:21 AM IST

नांदेड - मराठवाड्यातील एका बड्या राजकीय नेत्यास कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नांदेडमध्ये दोन अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये राजकीय दृष्या परिचित असलेल्या शिवाजीनगरमधून 61 वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तसेच विवेकनगरमधील 40 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 127 इतकी झाली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः कबूल केले होते. त्यानंतर त्याच मंत्रिमंडळातील मराठवाड्यातील एका बड्या मंत्र्यास कोरोनाची लागण झाल्याची माहिती असून त्यांच्या चालकालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 3149

• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या - 2828

• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1482

• अजून निरीक्षणाखाली असलेले - 256

• पैकी रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये - 71

• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2757

• आज घेतलेले नमुने - 172

• एकूण नमुने तपासणी - 3254

• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 127

• पैकी निगेटिव्ह - 2746

• नमुने तपासणी अहवाल बाकी - 243

• नाकारण्यात आलेले नमुने - 14

• अनिर्णित अहवाल – 122

• कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 62

• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 6

• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 32 हजार 91 या सर्वांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details