नांदेड -राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे स्वतः च्या लग्नाच्या विधी सोडून एका आमदाराला मुंबई ( Mumbai ) गाठावी लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील आमदार जितेश अंतापूरकर यांचे येत्या 3 जुलै रोजी लग्न आहे. पण काँग्रेस पक्षाने आपल्या आमदाराला मुंबईला बोलावल्याने अंतापूरकर यांनाही मुंबईला जावे लागले आहे. आता त्यांचे लग्न ठरलेल्या वेळेत होते की नाही, याची मतदारसंघात ( Constituency ) चर्चा रंगली आहे.
मतदारसंघात लग्नाची चर्चा -सत्ता संघर्ष सुरु असताना लग्नाची फ्लोर टेस्ट ही जितेश अंतापूरकर यांच्या समोर उभी राहिली आहे. मांडवात उभा राहू की विधिमंडळात असाच पेच अंतापूरकर यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे भावी नववधूला मांडवात वाट पाहावी लागणार का? ही चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सध्या सुरु आहे.