महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 20 मृत्यू, 950 नवे रुग्ण - corona

मंगळवारच्या 950 बाधितांसह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 41 हजार 956 वर गेली आहे. यातील 30 हजार 993 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 20 मृत्यू, 950 नवे रुग्ण
नांदेड जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 20 मृत्यू, 950 नवे रुग्ण

By

Published : Mar 30, 2021, 8:25 PM IST

नांदेड : जिल्ह्यात मंगळवार, 30 मार्च रोजी 950 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे अहवाल 2 हजार 509 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 448 तर अँटिजेन तपासणीद्वारे 502 अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

मंगळवारच्या 950 बाधितांसह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 41 हजार 956 वर गेली आहे. यातील 30 हजार 993 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण 73.87 टक्क्यांवर आले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी 20 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

165 बाधितांची प्रकृती अतीगंभीर
चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 हजार 509 अहवालांपैकी 1 हजार 509 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या 9 हजार 958 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 165 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

9 हजार 958 सक्रीय रुग्ण
जिल्ह्यात 9 हजार 958 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 254, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 82, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 90, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 104, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथे 109, मुखेड कोविड रुग्णालय येथे 252, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथे 36, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर येथे 64, बिलोली कोविड केअर सेंटर 32, हदगांव कोविड केअर सेंटर 66, लोहा कोविड केअर व कोविड सेंटर 99, कंधार कोविड केअर सेंटर 33, महसूल कोविड केअर सेंटर 163, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 15, धर्माबाद कोविड केअर सेंटर 56, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 23, बारड कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 21, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 26, माहूर कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर4, हदगाव कोविड केअर सेंटर 55, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 944, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 731, खाजगी रुग्णालय येथे 597, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत.

जिल्ह्याची स्थिती दृष्टीक्षेपात
एकुण घेतलेले स्वॅब - 3 लाख 8 हजार 63
एकुण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 59 हजार 580
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 41 हजार 956
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 30 हजार 993
एकुण मृत्यू संख्या -770
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - 73.87 टक्के
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 9 हजार 958

ABOUT THE AUTHOR

...view details