महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुरुजी तुम्ही सुद्धा... जुगार खेळताना 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक - ardhapur teachers gambling news

अर्धापूर तालुक्यात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून नऊ जणांवर कारवाई केली आहे. त्यात विशेष म्हणजे चार शिक्षकांचा समावेश आहे.

अर्धापूर पोलीस स्टेशन
अर्धापूर पोलीस स्टेशन

By

Published : Jun 10, 2021, 10:06 PM IST

अर्धापूर - सध्या लॉकडाऊचे दिवस. त्यातच अनेक शिक्षकांचे ज्ञानार्जनाचे कामच बंद आहे. त्यामुळे टाईमपास म्हणून काही शौकीन शिक्षकांनी जुगाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. अर्धापूर तालुक्यात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून नऊ जणांवर कारवाई केली आहे. त्यात विशेष म्हणजे चार शिक्षकांचा समावेश आहे. त्यातच कार्यवाही झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या गुरुजींचा काय आदर्श घ्यावा. गुरुजी तुम्ही सुद्धा...म्हणून अनेकजण अवाक झाले आहेत.

रोख 37 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त
अर्धापूर तालुक्यातील दाभड ते बामणी जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या संतोष टेकाळे यांच्या आखाड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून बुधवारी रात्री उशिरा कारवाई केली. यावेळी पोलिसांनी चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 37 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करुन अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

एका शेडमध्ये खेळत होते जुगार
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार आशिष बोराटे हे आपल्या पथकासह गस्त घालत होते. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी दाभड ते बामणी जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून संतोष पुरभाजी टेकाळे यांच्या शेतातील एका शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी नगदी 37 हजार 130 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. फौजदार आशिष बोराटे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलीस ठाण्यात मटका जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार लांडगे करत आहेत.

यांच्यावर गुन्हा दाखल
रवींद्रसिंग मोहनसिंग गाडीवाले (रा. टाउन मार्केट दत्तनगर नांदेड), रामकृष्ण हरीहरराव लोखंडे ( रा. दाभड, ता. अर्धापूर), संजय माधवराव माहुरकर, ( रा. महसुलनगर तरोडा बुद्रुक नांदेड ), चंपत उत्तमराव मुनेश्वर (रा. तामसा, ता. हदगाव), रमेश अर्जुन रणवीर ( रा. गुरुनगर ग्यानमाता शाळेजवळ नांदेड), लक्ष्मण दत्तराम शिंदे, (रा. दहिकळंबा ता. कंधार), वसंत बळीराम टेकाळे (रा. दाभड), राजू माणिकराव टेकाळे रा. दाभड आणि संतोष पुरभाजी टेकाळे रा. दाभड यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details