नांदेड- हदगाव तालुक्याच्या तामसा गावातील जिल्हा परिषद शाळेत एका विद्यार्थ्याच्या पोटात सळई घुसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा या घटनेमध्ये मृत्यू झाला असून जगदीश गजभारे, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी या घटनेसाठी शिक्षकांना जबाबदार धरले आहे.
पोटात सळई घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू, शिक्षक मागे लागल्याने घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप - जगदीश गजभारे
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेतील शिक्षक मागे लागल्याने जगदीशने संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप जगदीशच्या आजोबांनी केला आहे.
![पोटात सळई घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू, शिक्षक मागे लागल्याने घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3934868-thumbnail-3x2-nan.jpg)
शिक्षक मागे लागल्यानेच पोटात सळई घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
शिक्षक मागे लागल्यानेच पोटात सळई घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेतील शिक्षक मागे लागल्याने जगदीशने संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप जगदीशच्या आजोबांनी केला आहे.
या प्रकरणी पोलीस पंचनामा सुरू असून पोलीस तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, शाळेमध्ये अशा प्रकारची धोकादायक संरक्षक भिंत असू नये, असे नियम आहेत. मात्र, तरीही या शाळेत टोकदार सळई असलेली भिंत असल्यामुळेच ही घटना घडल्याचे समोर आले आहे.