नांदेड - मुदखेड तालुक्यातील त्रिकूट येथे हे पुरातन स्वयंभू मंदिर गोदावरी नदीच्या ( Godavari River ) पात्रात मंदिर वसलेले आहे. या मंदिराला कळस नाही आणि गाभाराही नाही. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती ही स्वयंभू असून, स्वतः शंकर-पार्वतीने स्थापन केली असल्याचे आख्यायिकेत सांगितले जाते. गोदावरीचे विस्तीर्ण नदीपात्र, हिरवागार परिसर आणि इतर नैसर्गिक ठिकाणे या भागात आहेत. त्यामुळे भाविकांसाठी त्रिकूट हे स्वयंभू गणेशमंदिर ( Trikut Ganapati ) नेहमीच आकर्षण ठरते. संकष्टी चतुर्थी तसेच इतर धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी येथे भाविकांची गर्दी होते. या मंदिराचा विकास करण्यासाठी या क्षेत्राला तीर्थक्षेत्राच दर्जा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Shankar Parvati Old Temple: नांदेड येथील शंकर पार्वतीने स्थापन केलेले त्रिकुटचे गणपती मंदिर - 800 Year Old Temple
श्री गणरायाची अनेक स्वयंभू ठिकाणे आहेत. त्यापैकी मुदखेड तालुक्यातील त्रिकूट येथे गोदावरी नदी पात्रात स्वयंभू गणेश मंदिर ( Trikut Ganapati) आहे. साधारणत ८०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून, जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारा ठरत आहे.
गणेश मंदिर
पिंडीतून गणेशाचा उगम -नदीपात्रात असलेल्या मंदिरातील श्री गणरायाची मूर्ती मनमोहक आहे. गोदावरी नदीपात्रात असल्याने पाणी ओसरल्यानंतरच भाविकांना मंदिरात प्रवेश करता येतो. नदीला पाणी असल्यास ग्रामस्थांसाठी बाहेरील भागात पुरातन स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे. सध्या येथे पाणी असल्यामुळे दर्शन घेता येत नाही. नदीचे पाणी ओसरल्यानंतरच भाविकांना दर्शन घेता येते.
Last Updated : Sep 7, 2022, 5:25 PM IST