नांदेड- शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत ८० लाख रुपयांचा गुटख्यासह १ ट्रक, कंटेनर असा एकूण १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली.
नांदेडमध्ये ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - स्थानिक गुन्हे शाखा
शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखू विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले.
शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखू विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार देगलूर नाका येथे छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या संशयित ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये १८ लाख ३६ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील असना टी पॉईंट येथे संशयित कंटनेर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याठिकाणीही छापा टाकण्यात आला. कंटनेरची तपासणी केली असता त्यामध्ये वर दुसरा माल व त्याखाली गुटखा, पान मसाला आदी पदार्थ असा एकूण ६१ लाख ९ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणात ट्रक, कंटेनरसह गुटखा असा एकूण १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.