महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडात उभारणार 8.50 कोटींचे भव्य ईबीसी वसतीगृह- अशोक चव्हाण - nanded marathi news

मागील अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांसाठीचे वसतीगृह भाड्याच्या जागेत सुरु होते.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

By

Published : Feb 10, 2021, 10:41 PM IST

नांदेड -मागील अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांसाठीचे वसतीगृह भाड्याच्या जागेत सुरु होते. जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या, विस्तार व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृह नसल्यामुळे होणारी गैरसोय दूर व्हावी अशी बर्‍याच दिवसांपासून मागणी होती.

वसतीगृहासाठीची प्रशासकीय मान्यता-

स्वतःच्या मालकीचे वसतीगृह नव्हते, ही मागणी लक्षात घेऊन यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष देऊन त्यांच्या प्रयत्नातून आता नांदेड शहराच्या मध्यभागी सुमारे 8.50 कोटींचे भव्य वसतीगृह उभारण्यात येणार आहे. या वसतीगृहासाठीची प्रशासकीय मान्यता शासनाने नुकतीच दिली आहे. नांदेड येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. परंतु या वसतीगृहाला स्वतःची इमारत नव्हती. भाड्याच्या जागेत हे वसतीगृह सुरु होते.

वसतीगृहामध्ये सर्व पायाभूत सुविधा-

स्वतःची इमारत नसल्यामुळे भाडे करार संपल्यानंतर वसतीगृहाची इमारत बदलण्याची वेळ येत होती. या संदर्भात नांदेड येथे भव्य वसतीगृह उभारण्यात यावे, अशी मागणी पुढे आली होती. या सर्व बाबींचा विचार करुन आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहासाठी पुरेशा निवासाची सोय असलेले व पायाभूत सुविधा उपलब्ध असणारे भव्य वसतीगृहाच्या बांधकामासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या इमारतीमध्ये विद्युतीकरण, स्वच्छतागृह यासह दिव्यांगांसाठी आवश्यक असलेली तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा-केंद्राकडून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ३ लाख कोटींची तरतूद - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details