महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : एटीएम सेंटरवर वृद्धाला फसवून ३७ हजाराची रोकड लांबवली - भाग्यनगर पोलीस ठाणे न्यूज

पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरवर गेलेल्या वृध्दाला हातचलाखीने फसवल्याची घटना नांदेडच्या स्नेहनगर भागात घडली. वृद्धाने दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम सेंटरवर वृद्धाला फसवले

By

Published : Nov 15, 2019, 12:35 PM IST

नांदेड -पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरवर गेलेल्या वृध्दाला हातचलाखीने फसवल्याची घटना घडली. अज्ञात आरोपीने वृद्घाच्या बँक खात्यातील ३७ हजार रूपये लांबवले.


रोनाल्ड जॉर्ज जेम्स (वय-७१, रा. श्रीनगर, नांदेड) असे फसवल्या गेलेल्या वृद्धाचे नाव आहे. शहरातील स्नेहनगर पोलीस कॉलनीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर २२ सप्टेंबरला रोनाल्ड जेम्स पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा एका अनोळखी इसमाने एटीएम कार्ड सुरू करुन देतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्याने रोनाल्ड यांचे एटीएम कार्ड स्वत:कडे घेऊन आपल्याकडील एटीएम कार्ड रोनाल्डला दिले.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची राऊत यांनी अशी उडवली खिल्ली


यानंतर मागील दोन महिन्याच्या काळात अज्ञात आरोपीने दोनदा रोनाल्ड यांच्या खात्यातून २० आणि १७ असे एकूण ३७ हजार रुपये काढले. फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर रोनाल्ड यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १३ नोव्हेंबरला भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details