नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कुलसचिवांच्या निवासस्थान परिसरातून चंदनाची सात झाडे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड विद्यापीठ परिसरातून सात चंदनाच्या झाडांची चोरी; गुन्हा दाखल - कुलसचिव
रविवारी अज्ञात चोरट्यांनी कुलसचिवांच्या निवासस्थानाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत लावलेली चंदनाची सात झाडे करवतीसारख्या धारदार शस्त्राने कापून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संग्राम छले यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात कुलसचिवांचे निवासस्थान आहे. विद्यापीठ परिसराच्या मोकळ्या जागेत विद्यापीठ प्रशासनाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यात काही चंदनाची झाडेही लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या झाडांवर चांगले लक्ष राहील या धोरणातून प्रशासनाने विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरात किमती चंदनाची झाडे लावण्यात आली होती.
रविवारी अज्ञात चोरट्यांनी कुलसचिवांच्या निवासस्थानाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत लावलेली चंदनाची सात झाडे करवतीसारख्या धारदार शस्त्राने कापून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संग्राम छले यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सय्यद करत आहेत.