महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये आज 6 नवे कोरोनाबाधित; आतापर्यंत 13 कोरोनाबधितांचा मृत्यू - 6 new patient nanded

आतापर्यंत एकूण 177 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 56 अहवालांपैकी 41 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. 

Government hospital nanded
Government hospital nanded

By

Published : Jun 15, 2020, 8:31 PM IST

नांदेड- जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 6 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 262 वर पोहोचली आहे.

6 बाधितांपैकी 1 पुरुष (वय 32 रा. बरकतपुरा नांदेड) आहे, तर उर्वरीत 5 बाधित व्यक्ती मुखेड विठ्ठल मंदिर येथील असून बाधितांपैकी 3 पुरुष वय वर्षे अनुक्रमे 47, 52 व 62 आहेत. दोन महिला वय वर्ष अनुक्रमे 52 व 55 वर्षाच्या आहेत.

आतापर्यंत एकूण 177 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 56 अहवालांपैकी 41 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत 72 बाधित व्यक्तींवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 व 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

जिल्ह्यात 72 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 7 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. आज 346 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

त्याचबरोबर, स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 279 एवढी संख्या आहे. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करून घ्यावे, जेणे करून आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करून प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 323

घेतलेले स्वॅब- 5 हजार 298

निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 400

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 6

एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 262

स्वॅब तपासणी अनिरणित संख्या- 200

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या -83

मृत्यू संख्या- 13

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 177

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 72

ABOUT THE AUTHOR

...view details