नांदेड - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट झाली आहे, मात्र त्याचबरोबर कोरोना टेस्टचे प्रमाण देखील कमी झाले आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 612 अहवालांपैकी 584 अहवाल हे कोरोनाबाधित आले आहेत. यातील आरटीपीसीआर तपासणीद्वारे 487 तर अँटिजेन तपासणीद्वारे 97 अहवाल हे कोरोनाबाधित आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 80 हजार 766 वर पोहोचली आहे. त्यापैकी 68 हजार 752 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 10 हजार 178 रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील 222 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. दि. 29 एप्रिल ते 1 मे या तीन दिवसांच्या कालावधीत एकूण 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ही 1 हजार 574 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील 1 हजार 141 केरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 8, मनपांतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 575, धमार्बाद तालुक्यातंर्गत 35, देगलूर कोविड रुग्णालय 27, अर्धापूर तालुक्यांतर्गत 23, उमरी तालुक्यांतर्गत 44, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 15, मुखेड कोविड रुग्णालय 33, नायगाव तालुक्यांतर्गत 25, किनवट तालुक्यांतर्गत 38, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 37, बिलोली तालुक्यांतर्गत 40, बारड कोविड केअर सेंटर 11, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 11, कंधार तालुक्यांतर्गत 28, माहूर तालुक्यांतर्गत 26, लोहा तालुक्यांतर्गत 33, खासगी रुग्णालय 124 या रुग्णाचा समावेश आहे.
उपलब्ध असलेल्या बेडची संख्या