नांदेड - जिल्हा परिषदेकडे तब्बल ५६ कोटी ४५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत असून त्यापैकी केवळ १६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे थकीत व अग्रिम पाणीपट्टीची रक्कम भरणा केली नसल्यामुळे यापुढे पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाच्या वतीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाणी पट्टी भरली तरच ग्रामीण भागाला पाणी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेड जिल्ह्यावर पाण्याचे संकट येणार असल्यामुळे पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेकडे ५६ कोटींची थकबाकी; इसापूर धरणाचे पाणी मिळणे झाले अवघड...! - dam
जून २०१८ अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे ५५ कोटी ८२ लाख रुपये तसेच २०१८ - १९ या वर्षासाठी आरक्षित पाण्याची ५० टक्के अग्रीम पाणीपट्टी ६३ लाख रुपये, अशी एकूण ५६ कोटी ४५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.
जिल्हा परिषदेकडे ५६ कोटींची थकबाकी
जून २०१८ अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे ५५ कोटी ८२ लाख रुपये तसेच २०१८ - १९ या वर्षासाठी आरक्षित पाण्याची ५० टक्के अग्रीम पाणीपट्टी ६३ लाख रुपये, अशी एकूण ५६ कोटी ४५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यापैकी फक्त १६ लाख रुपये इतका भरणा करण्यात आला आहे. उर्वरित रक्कम जिल्हा परिषदेकडून भरण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणी पट्टी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.