नांदेड - भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील सालगड्याने आपल्या शेत मालकाच्या ५ वर्षीय चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने खून केल्यानंतर मुलीचा मृतदेह शेताशेजारी असलेल्या सुधा नदी पात्रात फेकून दिला.
सालगाड्यानेच नेले पळवून
भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील एक शेत मालकाने त्यांची पाच वर्षीय मुलगी दुपारी घरी नसल्याचे पाहून शोधशोध केली. त्यानंतर त्यांना सालगडी बाबू खंडू सांगेराव यानेच त्या चिमुकलीला पळून नेला असल्याचा संशय आला. तेव्हा त्यांनी भोकर पोलिसात ही माहिती दिली. त्या दोघांचा शोध घेत असताना दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान त्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह तेलंगाना सीमेजवळ सुधा नदी पात्रात मिळाला. यावेळी तिच्यावर पाशवी बलात्कार करून निघृण खून केल्याचे निदर्शनास आले.
पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून, नांदेडमधील घटना - 5 year old Girl sexually abused news
भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील सालगड्याने आपल्या शेत मालकाच्या ५ वर्षीय चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
सहायक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांचा ताफा तात्काळ घटनास्थळी पोहोचला व त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना आरोपी नदी पात्राजवळ लपून बसल्याचे दिसले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत असताना संतापलेल्या जमावाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजनकर, पोलीस निरिक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे, पोलीस उपनिरिक्षक सूर्यकांत कांबळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त जमावावर नियंत्रण मिळवले.
भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपी बाबू खंडू सांगेराव यास ताब्यात घेऊन भोकर ठाण्यात आणले असून, पीडित मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार सदरील मृत पीडितेवर पाशवी बलात्कार करून तिचा निघृण केला असावा, असे सांगण्यात येत आहे. या अमानुष घटनेविषयी पीडित मृत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. बाबू खंडू सांगेराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.