महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी... आतापर्यंत 41 रुग्ण कोरोनातून झाले बरे..!

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 3 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय, बारड येथील कोविड केअर सेंटरमधील 1 रुग्ण व यात्री निवास एनआरआय कोविड सेंटर येथील 1 रुग्ण, असे एकूण 5 रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली आली.

नांदेड
नांदेड

By

Published : May 21, 2020, 9:22 PM IST

नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. आतापर्यंत ४१ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

नांदेड

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 3 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय, बारड येथील कोविड केअर सेंटरमधील 1 रुग्ण व यात्री निवास एनआरआय कोविड सेंटर येथील 1 रुग्ण, असे एकूण 5 रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली आली. आतापर्यंत 110 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरित 62 रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 26 हजार 716 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून एकूण 2 हजार 827 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 461 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून बुधवार 21 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 66 रुग्णांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील व 64 रुग्णांची स्वॅब तपासणी चालू आहे. घेतलेल्या एकूण स्वॅबपैकी 110 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत एकूण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या 62 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे तर पंजाब भवन कोविड केअर सेंटर व यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोविड केअर सेंटरमध्ये 1 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 1 रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करून घ्यावे, जेणे करून आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details