नांदेड - जिल्ह्यातील कंधार येथील जगतुंग तलावात बुडून 5 जणांचा 5 Children Drowned in Jagtung Lake Nanded मृत्यू झाला आहे. पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. यातील दोन सख्खे भाऊ तर अन्य तीन जण चुलते आहेत. नांदेड शहरातील खुदबई नगर येथील दोन कुटुंब कंधार येथील दर्गाच्या दर्शनासाठी गेले होते. पाच जण तलावात पोहण्यासाठी गेले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. सर्व जण 15 ते 23 वयोगटातील आहेत.
प्रतिक्रिया देताना मृतकाचे नातेवाईक मृतकांची नावे
मोहम्मद विखार (वय 23), मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन (वय 15), सय्यद सोहेल सय्यद वाहिद
(वय 20), मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार (वय 45), सय्यद नवीद सय्यद वाहिद (वय 15) अशी मृतकांची नाव आहेत. हे सर्व युवक नांदेडच्या खुदबेनगर येथील रहिवासी आहेत.
नेमकं काय घडलंनांदेडमधील खुदबई नगर येथील दोन कुटुंब कंधार येथे गेले होते. त्याठिकाणी त्यांनी दर्ग्याचे दर्शन घेतलं. लहान मुलं आणि महिला या दर्ग्यामध्येच होते. कुटुंबातील तरुण मुलं तलावात पोहण्यासाठी गेले. पण, पाण्याचा अंदाज काही आला नाही. त्यामुळं बुडून त्यांचा मृत्यू झाला. पाच जण बुडाल्याचं लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आलं. पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कंधार येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आले. यावेळी अनेक लोकांनी गर्दी केली. दोन कुटुंबातील हे तरुण होते. घरचे कर्ते तरुण गेल्यानं कुटुंबीयांत दुःखत वातावरण आहे. तरुण पाण्यात पोहोयला गेले नसते तर परिस्थिती वेगळी राहिली असती.