नांदेड- जिल्ह्यात शनिवारी (दि.19 सप्टें.) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच्या आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 332 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 118 तर अँटिजेन तपासणीद्वारे 214 बाधित आले. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या आता 13 हजार 316 एवढी झाली असून आहे.
नांदेड जिल्ह्यात 332 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ सात जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात शनिवारी आलेल्या अहवालानुसार 332 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे.
आज 297 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 9 हजार 54 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. तर सात जणांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 845 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. त्यापैकी 34 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.19 असे वाढले आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब- 71 हजार 292
निगेटिव्ह स्वॅब- 54 हजार 659
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या -332
एकूण बाधित व्यक्ती- 13 हजार 316
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 16
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 6
एकूण मृत्यू संख्या- 350
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 9 हजार 54
आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 845
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 288
आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 34
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण -70.19 टक्के
हेही वाचा -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी