महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 11, 2019, 9:16 AM IST

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यासाठी रविवार ठरला 'घातवार', विविध ठिकाणी झालेल्या ३ अपघातात ३ जण जागीच ठार

देगलूर शहरातील नरंगल रोडवरील अबुबखर कॉलनीत राहणारे मूळगाव मानूर येथील शेख गफूर शेख बंदगी (४५ वर्षे) हे सध्या शहापूर येथील इंदिरा गांधी कन्या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. ते १० मार्चला सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान, हनुमान हिप्परगा रोडवर मॉर्निंग वॉकसाठी जाताना त्यांना समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने धडक दिली. या धडकेत गफूर जागीच ठार झाले.

अपघात

नांदेड - जिल्ह्यात विविध ठिकाणी ३ अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. देगलूर शहरात रविवारी २ ठिकाणी झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाले. तिसऱ्या घटनेत नरसी (ता. नायगाव) रोडवर टँकरच्या धडकेने १ जण जागीच ठार झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी रविवार हा घातवार ठरला आहे.

देगलूर शहरातील नरंगल रोडवरील अबुबखर कॉलनीत राहणारे मूळगाव मानूर येथील शेख गफूर शेख बंदगी (४५ वर्षे) हे सध्या शहापूर येथील इंदिरा गांधी कन्या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. ते १० मार्चला सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान, हनुमान हिप्परगा रोडवर मॉर्निंग वॉकसाठी जाताना त्यांना समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने धडक दिली. या धडकेत गफूर जागीच ठार झाले.

दुसरी घटना तुकाराम नगरी समोर दुपारी २ वाजता घडली. मुखेड येथील शेख कुटुंबीयांना विवाह सोहळ्याहून परत घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने (क्रमांक एम. एच. २६ बी - २९९) तुकारामनगरी समोरील रस्ता ओलांडणाऱ्या नारायण बाबुराव वाघमारे (वय ४२ वर्ष) यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नारायण वाघमारे यांच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू रस्त्यावर पडला आणि ते जागेवरच ठार झाले. पहिल्या अपघातासंदर्भात पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही. दुसऱ्या घटनेतील ट्रॅव्हल्स चालक अपघात घडताच पळून गेला. ट्रॅव्हल्स चालक किंवा मालक यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेतले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेत पोलीस ठाण्यासमोर बराच वेळ ठाण मांडून बसले होते. हयगय आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृताचा पुतण्या रितेश वाघमारे याच्या तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ अ भारतीय दंड विधान अन्वये देगलूरकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक काथवटे करत आहेत.
तिसऱ्या घटनेत नरसी (ता. नायगाव) चौरस्त्यावर संध्याकाळनंतर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. यामध्ये अवजड वाहनांची संख्याही फार मोठ्या प्रमाणात आहे. काही बेशिस्त वाहन चालक चौकातून देखील वाहने बेदरकारपणे चालवत असल्याचे अनेकवेळा बघायला मिळते. तसेच मुख्य रस्त्यावर आडवे तिडवे वाहने उभी राहिल्याने येथील चौरस्ता परिसरात संध्याकाळी पायी चालणे देखील प्रचंड कसरतीचे ठरते. यातून यापूर्वी अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. दरम्यान येथील नारायण बाबा गुडमलवार (६०) हे शनिवारी रात्री किराणा सामान खरेदी करण्यासाठी चौकात आले होते. खरेदी आटोपून गुडमलवार आपल्या घरी निघाले असता चौकात भरधाव वेगात आलेल्या एका मालवाहू टँकरने गुडमलवार यांना जोरदार धडक दिली. धडकेत रोडवर कोसळलेल्या गुडमलवार यांच्या अंगावरून टँकर पुढे निघून गेला. पूर्णपणे चिरडले गेल्याने गुडमलवार हे जबर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेतील गुडमलवार यांचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेनंतर रस्त्यावर अक्षरशः रक्तमांसाचा सडा पडल्याचे चित्र होते. गुडमलवार यांना चिरडून मुजोर टँकर चालक मात्र सुसाटपणे वाहन चालवून फरार झाला. संतप्त युवकांनी पाठलाग करून नायगावजवळ एक संशयित टँकर पकडला. सदर टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details