नांदेड -जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला मोठ्या अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. नांदेड तालुक्यातील नांदुसा येथील एक ३ एकर केळीची बाग तीव्र तापमानामुळे करपली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नांदुसा (ता.नांदेड) येथील गणेश तुकाराम जनाकवाडे आणि मारोती तुकाराम जनाकवाडे यांनी आपल्या ३ एकर शेतात केळीची लागवड केली आहे. मात्र, जिल्ह्यात काही दिवसांपासून तीव्र तापमानाने उच्चांक गाठला असल्याने याचा परिणाम त्यांच्या केळी पिकांवर झाला आहे. केळीची सर्व पाने करपून गेले आहेत. शिवाय केळीचे घडही आपोआप गळून पडत आहे. त्यांना केळी पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र, उच्च तापमानाने त्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.