नांदेड - कोरोना लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या अनेक मजूरांची उपासमार होत आहे. त्यामुळे अनेक मजूरांनी पायी घरी जाण्याचा मार्ग निवडला होता. नांदेड-नागपूर महामार्गावरून जात असणाऱ्या मजूरांना अर्धापूर येथे थांबवण्यात आले होते. नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी या मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना महामंडळाच्या बसने मंगळवारी रवाना केले.
पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांची दुसरी बस अर्धापूरहून रवाना
नांदेड-नागपूर महामार्गावरुन मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि इतर काही राज्यांतील मजूर पायी जात आहेत. अशा अनेक मजूरांना अर्धापूर येथे थांबवण्यात आले होते. नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी या मजूरांची आरोग्य तपासणीकरून त्यांना महामंडळाच्या बसने मंगळवारी रवाना केले.
नांदेड-नागपूर महामार्गावरुन मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि इतर काही राज्यांतील मजूर पायी जात आहेत. अशा मजूरांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, अर्धापूरचे तहसीलदार सुजीत नरहरे, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, अर्धापूरचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांच्या सूचनेप्रमाणे थांबवण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरूषोत्तम मोरे, डॉ. विशाल लंगडे हे त्यांची आरोग्य तपासणी करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. त्यानंतर या मजूरांना त्यांच्या गावी रवाना केले जात आहे. मंगळवारी अशाच मजुरांना घेवून एक बस पाठवण्यात आली.
पत्रकार लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर यांनी या मजूरांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. यापूर्वी अर्धापूर येथून रविवारी २२ मजुरांना घेऊन पहिली बस रवाना झाली होती.