महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड: वाढत्या प्रवाशांमुळे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये २६ विशेष रेल्वेगाड्या

तिरुपतीहून नगरसोलला जाणाऱ्या गाडीचा क्र.०७४१७ असा असून ही रेल्वेगाडी जानेवारी महिन्याच्या ३, १०, १७, २४ व ३१ तर फेब्रुवारी महिन्याच्या ७, १४, २१ व २८ रोजी धावणार आहे. सिकंदराबाद ही रेल्वेगाडी रात्री- ०८:१५ वाजता पोहचून ०८:२५ वाजता नगरसोलकडे रवाना होईल.

26-special-trains-for-tirupati-to-nagarsol-in-nanded
नांदेड

By

Published : Dec 18, 2019, 5:20 PM IST

नांदेड- प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती ते नगरसोलदरम्यान जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये २६ साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ती रेल्वेगाडी दर शुक्रवारी तिरुपतीहून नगरसोलसाठी सकाळी ७:३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी ११:५५ वाजता नगरसोलला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर शनिवारी रात्री १०:०० वाजता नगरसोलहून निघून दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी ४ वाजता तिरुपतीला पोहचणार आहे.

हेही वाचा-नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक

तिरुपतीहून नगरसोलला जाणाऱ्या गाडीचा क्र.०७४१७ असा असून ही रेल्वेगाडी जानेवारी महिन्याच्या ३, १०, १७, २४ व ३१ तर फेब्रुवारी महिन्याच्या ७, १४, २१ व २८ रोजी धावणार आहे. सिकंदराबाद ही रेल्वेगाडी रात्री- ०८:१५ वाजता पोहचून ०८:२५ वाजता नगरसोलकडे रवाना होईल. नगरसोलहन तिरुपतीकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीचा क्र.०७४१८ असून ती गाडी जानेवारी महिन्याच्या ४, ११, १८ व २५ तर फेब्रुवारी महिन्याच्या १, ८, १५, २२ व २९ रोजी धावणार आहे. सिकंदराबादला ही रेल्वेगाडी सकाळी ११.५५ वाजता पोहचून दुपारी १२.०५ वाजता तिरुपतीकडे रवाना होईल. या रेल्वेगाडीला रेनीगुंटा, गुडूर, नेल्लोर, ओंगल, तेनाली, गुंटूर, साते नापल्ली, पिदुगुरुला, नाडीकुडी, मिरयालागुड्डा, नलागोंडा, चेरकापल्ली, सिकंदराबाद, बेगमपेठ, लिंगपल्ली, शंकरपल्ली विकाराबाद, जहीराबाद, बिदर, भालकी उदगीर, लातूररोड, पानगाव, परळी, गंगाखेड-परभणी, मानवतरोड, सेलू, परतूर, जालना औरंगाबादमार्गे जाईल,अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details