महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Youth Died in Accident: देवदर्शनाला जाणाऱ्या भक्तावर काळाचा घाला; अर्धापूर-नांदेड महामार्गावरील अपघात - Youth Died in Accident

संकष्टी चतुर्थीनिमित्त नांदेडच्या कैलासनगर येथील रहिवासी असलेला 25 वर्षीय अक्षय जैन हा नांदेडहून संकष्टी चतुर्थीनिमित्त दाभडच्या सत्य गणपती येथे देवदर्शनासाठी येत असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरात धडक देऊन चिरडले. दरम्यान तरूण जागीच ठार ( 25 year old youth died in accident ) झाला. तर अज्ञात वाहनचालक हा फरार झाला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 11, 2022, 9:32 PM IST

नांदेड: दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीनिमित्त हजारो भाविक भक्त आणि महिला मोठ्या प्रमाणात तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान अशी ओळख असलेल्या सत्य गणपती येथे पायी चालत येत असतात. त्याच अनुषंगाने आज दि.11 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान नांदेडहून सत्य गणपतीला येत असलेल्या एका 25 वर्षीय तरुणास भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत त्या तरुणाचा जागीच मृत्यू ( 25 year old youth died in accident ) झाला.

तरूणाचा जागीच मृत्यू: संकष्टी चतुर्थीनिमित्त नांदेडच्या कैलासनगर येथील रहिवासी असलेला अक्षय जैन हा नांदेडहून संकष्टी चतुर्थीनिमित्त दाभडच्या सत्य गणपती येथे देवदर्शनासाठी येत असताना अर्धापूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरात धडक देऊन चिरडले.

वाहनचालक फरार: अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि वसमत फाटा महामार्ग पोलीस चौकीचे कर्मचारी आणि यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन रितसर कार्यवाही पूर्ण केली. मयत तरुणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details